संस्थेचे सेवाकार्य
सकल मराठा परिवार समाजाच्या प्रगतीसाठी, सर्व घटकांसाठी कार्यरत आहे.


शिक्षण क्षेत्र
महाराष्ट्र सरकार स्थापित स्वायत्त संस्था म्हणून सारथी संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात जे उपक्रम राबविले जातात, ते सर्व उपक्रम तळागाळातील मराठा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम SMP प्रतिनिधी यांच्याकडून केले जाते...
प्रमुख सेवा क्षेत्रे


आरोग्य क्षेत्र
सकल मराठा परिवार टीम मेडिकल क्षेत्रामध्ये गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत आहे. यामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावर घेतली जाणारी रक्तदान शिबीरे, वृद्धांसाठी आरोग्य शिबीरे (BP, डोळ्यांचे आजार व इतर मार्गदर्शन), दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र च्या काना-कोपऱ्यात गोरगरीब लोकांचे ऑपेरेशन मोफत किंवा कमी खर्च मध्ये करून देणे, डिलीव्हरी केसेस, अशा अनेक गोष्टीमध्ये शक्य तेवढी (आर्थिक वगळता) मदत SMP टीम चे प्रतिनिधी करत असतात...


नोकरी व रोजगार क्षेत्र
व्यवसाय आणि उद्योग क्षेत्र
सकल मराठा परिवार कडून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 300+ प्रत्येक तालुका स्तरावर तालुका प्रतिनिधी नेमून देण्यात आलेले आहेत. हे प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना च्या माध्यमातून मराठा उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि मराठा नवउद्योजकांना नवीन व्यवसाय उभारण्यासाठी मोफत मार्गदर्शन करत असतात. येणार्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावांत SMP प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेच्या माध्यमातुन मराठा बांधवांना व्यावसायिक प्रगती संदर्भात मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध असतील...
समाजातील बेरोजगार मराठा तरुणांना नोकरी मिळावी या उद्देशाने नोकरीच्या संधी असलेल्या जाहिराती एका PDF मध्ये एकत्रित करून त्या सोशल मीडिया च्या माध्यामातून मराठा तरुणांपर्यंत पोहोचवल्या जातात. यासोबत वेळोवेळी कॉर्पोरेट आणि सरकारी क्षेत्रातील नोकरी संदर्भात आपण Facebook/YouTube सारख्या माध्यमांचा वापर करून तज्ञ व्यक्तींचे live विडिओ घेऊन मार्गदर्शन केले जाते. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या कडून राबविल्या जाणार्या कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मराठा तरुणांना कौशल्य विकास आणि व्यक्तिगत विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात...


इतर सेवा क्षेत्रे


आपत्कालीन मदत
अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत २ वेळचे जेवण पुरविण्यात आले होते. सोबतच...


गडकिल्ले संवर्धन
महाराष्ट्रातील गडकिल्ले हे ऐतिहासिक वारसा आहेत आणि त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. सकल मराठा परिवार फौंडेशन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवते...

आपण कसे योगदान देऊ शकता ?
आमच्या सेवांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आम्हाला संपर्क करा.


