व्यवसाय आणि उद्योग क्षेत्र
सकल मराठा परिवार कडून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 300+ प्रत्येक तालुका स्तरावर तालुका प्रतिनिधी नेमून देण्यात आलेले आहेत. हे प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना च्या माध्यमातून मराठा उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि मराठा नवउद्योजकांना नवीन व्यवसाय उभारण्यासाठी मोफत मार्गदर्शन करत असतात.
येणार्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावांत SMP प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेच्या माध्यमातुन मराठा बांधवांना व्यावसायिक प्रगती संदर्भात मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध असतील.
यासोबतच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हास्तरावर व्यवसाय मेळावा घेण्याचे नियोजन सुद्धा आखले जाईल.
प्रमुख फायदे
अनुभवी उद्योजकांकडून व्यवसाय मार्गदर्शन
कर्ज योजना आणि आर्थिक संसाधनांची उपलब्धता
व्यावसायिक योजना विकासात सहाय्य
मार्केटिंग आणि डिजिटल उपस्थिती मार्गदर्शन
उद्योग तज्ञांसोबत नेटवर्किंग संधी
नियमित व्यावसायिक विकास कार्यशाळा आणि कार्यक्रम


