आरोग्य क्षेत्र

सकल मराठा परिवार टीम मेडिकल क्षेत्रामध्ये गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत आहे. यामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावर घेतली जाणारी रक्तदान शिबीरे, वृद्धांसाठी आरोग्य शिबीरे (BP, डोळ्यांचे आजार व इतर मार्गदर्शन), दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र च्या काना-कोपऱ्यात गोरगरीब लोकांचे ऑपेरेशन मोफत किंवा कमी खर्च मध्ये करून देणे, डिलीव्हरी केसेस, हॉस्पिटल चे बिल कमी करणे अशा अनेक गोष्टीमध्ये शक्य तेवढी (आर्थिक वगळता) मदत SMP टीम चे प्रतिनिधी करत असतात.

Covid काळात पेशंटना बेड उपलब्ध करून देणे, औषधी/इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात मदत करणे, ब्लड/प्लाझ्मा उपलब्ध करून देणे, मानसिक आधार, रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरवणे इत्यादी प्रकारची कामे SMP प्रतिनिधी कडून करण्यात आलेली आहेत.

assorted medication tables and capsules
assorted medication tables and capsules

प्रमुख फायदे

  • मोफत आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंग

  • परवडणाऱ्या वैद्यकीय सेवांशी संपर्क

  • आरोग्य शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम

  • प्रतिबंधात्मक काळजी कार्यशाळा

  • मानसिक आरोग्य समर्थन आणि समुपदेशन

  • गंभीर उपचारांसाठी वैद्यकीय खर्चात सहाय्य

रक्तदान शिबिरे

जिल्हा आणि तालुका स्तरावर नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन.

वैद्यकीय शिबिरे

वृद्धांसाठी आरोग्य शिबिरे, दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणे.

आपत्कालीन आरोग्य सहाय्य

कोविड काळात केलेल्या मदतीप्रमाणेच इतर आपत्कालीन परिस्थितीतही वैद्यकीय मदत उपलब्ध करणे.