सकल मराठा परिवार (SMP)
सकल मराठा परिवार (SMP) मराठा समाजाला मुख्यतः शैक्षणिक, व्यवसायिक, नोकरी व आर्थिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारी संस्था असून, सोबतच समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने वैद्यकीय क्षेत्रात समाजातील सर्व घटकांना सतत मदत करत आहे व भविष्यात करत राहणार आहे
मिशन :- (short term) सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा तरुण पिढी मध्ये मराठा विकासाचे बीज रोवून एक कट्टर मराठा फळी तयार करणे.
व्हिजन :- (Long Term) मराठा समाजातील तरुण पिढीला भविष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, नोकरी, व्यावसायिक इत्यादी प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आणणे आणि त्यायोगे सामान्य मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे. समाजातील शहरी व ग्रामीण भागातील मराठा वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्धरीत्या प्रयत्न करणे.
आमचा प्रवास
स्थापना वर्ष: सकल मराठा परिवार संघटनेची स्थापना ११ ऑक्टोबर 2022 रोजी झालेली असून या संघटनेतील बरेच सदस्य व प्रतिनिधी यांनी 2016 पासून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या हिताचे जेवढे उपक्रम होत आलेले आहेत, त्या सर्वांमध्ये आपापल्या पातळीवर सहभाग नोंदवलेला आहे.




पार्श्वभूमी माहिती:
सकल मराठा परिवार मधील मराठा बांधव समाजकार्यात जवळपास 2016 पासून काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मराठा समाजाच्या शैक्षणिक, व्यावसायिक, आरोग्य व नोकरी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये वेळोवेळी जमेल त्या पद्धतीने व वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. ही सर्व कामे करत असताना बऱ्याचदा समोरासमोर झालेल्या भेटी मधून असे निदर्शनास आले, की एका सुनियोजित आणि कॉमन प्लॅटफॉर्मची गरज आहे. म्हणूनच सकल मराठा परिवार मधील काही सदस्यांनी मिळून या संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला व त्या माध्यमातून वर नमूद केलेल्या उपक्रमा सहित इतरही बरेच मराठा हिताचे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


आव्हाने आणि भविष्यातील अडचणी:
विविध राजकीय पक्षांसोबत जोडलेल्या मराठा तरुणांमध्ये जागृती करून त्यांच्यामध्ये मराठावाद जोपासणे गरजेचे आहे. एक कट्टर मराठा म्हणून आपल्या सोबत जोडलेल्या प्रत्येक बांधवाने संघटनेचे ध्येय समजून घेऊन त्या दिशेने जमेल त्या पातळीवर जबाबदारी घेऊन प्रयत्न केले पाहिजेत.
मराठा तरुणांमध्ये क्षमता असूनही नौकऱ्या अभावी वाढती बेरोजगारी व त्यामुळे येणाऱ्या नैराश्यातुन काही तरुण गुन्हेगारी कडे वळण्याची शक्यता असू शकते व त्यामुळे त्यांचा दैनंदिन जीवनातील कुटुंबावर होणारा परिणाम यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे.
भविष्यातील सामान्य नियोजन:
एखाद्या समाजामध्ये राहत असलेल्या सदस्यांची संख्या त्या समाजाची ताकद ठरू शकते. परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तो समाज आणि त्यामध्ये राहत असलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि सदस्यांमध्ये एकीची भावना असेल. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या संख्येबद्दल सर्वजण अवगत आहेतच, पण एवढी मोठी संख्या असून सुद्धा मराठा समाजामध्ये एकीच्या भावनेची उणीव कायम भासत राहते. ही उणीव भासण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मराठा समाजातील श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील रुंदावत चाललेली दरी होय.
सकल मराठा परिवारामध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांपैकी बहुतांश लोक सामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील आहेत. श्रीमंत वर्गातील मराठा बांधवांची आपल्या सोबत येण्याची इच्छा असून सुद्धा त्यांच्या वैयक्तिक राजकीय, सामाजिक किंवा पारिवारिक महत्त्वकांक्षा जपण्यासाठी ते प्रत्यक्षपणे आपला सहभाग दर्शवू शकत नाही. या सगळ्यांमध्ये एक सकारात्मक गोष्ट अशी, की सकल मराठा परिवारासोबत सधन वर्गातील मराठा समाज अप्रत्यक्षपणे जोडला गेलेला/जात आहे. सामान्य वर्गातील सदस्यांनी आपापल्या परीने संघटनेतील उपक्रमांमध्ये आपला वेळ देऊन जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.
आत्ताच्या परिस्थितीमध्ये संघटनेची सदस्य संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर संघटनेच्या कार्यप्रणाली मध्ये नमूद केलेल्या विषयांना अनुसरून जे काही उपक्रम राबवता येतील, त्याद्वारे तालुका आणि गाव पातळीवरील मराठा बांधवांना आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सुरुवातीच्या काळात संघटन मजबूत करण्यासाठी उपक्रम राबवताना समाजाच्या भावनांचा विचार करून नियोजन केले पाहिजे. उदाहरणार्थ पुणे, सातारा, कोल्हापूर, इत्यादी अशा जिल्ह्यांमध्ये गड किल्ले हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. या जिल्ह्यातील सकल मराठा परिवार प्रतिनिधी यांनी गड किल्ले संबंधित उपक्रम राबवले पाहिजेत. जेणेकरून जास्तीत जास्त बांधव अशा उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवतील आणि सोबतच संघटन गावागावात पोहोचण्यास मदत होईल.
अशा प्रकारे इतर जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि सदस्यांनी आपापल्या जिल्हा किंवा तालुका पातळीवर विचार करून वर नमूद केल्याप्रमाणे भावनात्मक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळी संघटन गाव पातळीपर्यंत पोहोचून मजबूत होईल, त्यानंतर प्रत्येकाने ठराविक रित्या फक्त आणि फक्त मराठा बांधवांचा फायदा करून देणारे उपक्रम राबवता येतील.
असे उपक्रम राबवत असताना कोणत्या वर्षी काय उपक्रम राबवावेत हे ठरवण्यासाठी संघटनेचे एक, तीन आणि दहा वर्षांपर्यंतचे वेगवेगळे टारगेट/ ध्येय डोळ्यासमोर ठेवणे महत्त्वाचे आहे.
आर्थिक विहंगावलोकन:
सकल मराठा परिवार संघटना कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग घेत नाही. तसेच एखाद्या बांधवाच्या मेडिकल इमर्जन्सी मध्ये हॉस्पिटल साठी येणाऱ्या खर्चामध्ये मदत म्हणून पोस्ट केव्हा मेसेजेस अप्रूव करत नाही.
सकल मराठा परिवार च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे प्रॉडक्ट्स किंवा उत्पादने यांची विक्री केली जात नाही.
ज्यावेळी एखादा खर्चिक उपक्रम घ्यायचे ठरवले जाते, तेव्हा आपल्याच परिवारातील काही मराठा उद्योजक यांच्याकडून त्या उपक्रमासाठी स्पॉन्सरशिप घेतली जाते आणि अशा उपक्रमांचे नियोजन लोकल लेवलला (जिल्हा किंवा तालुका पातळीवर) केल्यामुळे त्यामध्ये पारदर्शीता ठेवणे सोपे जाते. यासोबतच स्पॉन्सरशिप दिलेल्या मराठा उद्योजकांची व्यावसायिक जाहिरात होऊन त्यांना सुद्धा हातभार लावला जातो.
सोशल मीडिया आणि ऑनलाइन उपस्थिती:
आधुनिक युगात संवाद आणि जागरुकता वाढविण्यासाठी सोशल मीडिया एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. सकल मराठा परिवार फेसबुक, इन्स्टाग्राम, आणि व्हाट्सएप यासारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे.
आमच्या ऑनलाइन उपस्थितीमुळे आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि आमच्या उपक्रमांबद्दल जागरूकता वाढविण्यास मदत होते. आमच्या सोशल मीडिया हँडल्सचा वापर करून आपण आमच्या कार्यक्रमांविषयी अपडेट मिळवू शकता आणि आमच्याशी संवाद साधू शकता.



