भूमिकाधारित ऑनबोर्डिंग, बढती, पदकपात, निलंबन व निष्कासन धोरण

भूमिकाधारित ऑनबोर्डिंग, बढती, पदकपात, निलंबन व निष्कासन धोरण:
1) समान तत्वे (सर्व पदांसाठी लागू)
  • आदर, समावेशकता, गैर-राजकीय व गैर-भेदभावपूर्ण वर्तन अनिवार्य.

  • डेटा गोपनीयता: संमतीशिवाय वैयक्तिक माहिती शेअर करू नये.

  • फोटो/व्हिडिओपूर्वी संमती; अल्पवयीनांकरिता पालकसंमती अनिवार्य; अधिकृत ब्रँडिंग वापर

  • कोणतेही वैयक्तिक/व्यावसायिक हित असेल तर लेखी जाहीर करणे.

2) जिल्हा ऍडमिन
(पात्रता)
  • संघटनात्मक शिस्त, कायदेशीर/धोरणज्ञान,

  • डिजिटल साधनांची जाण,

  • नैतिकतेची प्रतिष्ठा,

  • सध्या कार्यरत असलेल्या किमान एका ऍडमिन कडून शिफारसपत्र,

  • कागदपत्रे: मराठा असल्याचा पुरावा, मराठा कार्यात सहभागी असल्याचे पुरावे,

  • स्वयंसेवक म्हणून किमान १ वर्ष काम.

(पदकपात)
  • गैरवर्तन, नियम/धोरण अनुपालनात त्रुटी

    • तपास-नोटीस → स्पष्टीकरण → सुधारणा योजना (90 दिवस) → आंशिक अधिकार कमी.

(निलंबन)
  • डेटा उल्लंघन, गंभीर आचारसंहिता उल्लंघन, आर्थिक अनियमितता संशय.

    • तात्पुरते प्रवेश-निलंबन → 15 दिवसांत आंतरिक तपास → अहवाल

    • परिणाम: दोष सिद्ध झाल्यास निष्कासन/पदकपात.

(निष्कासन)
  • कारणे: सिद्ध आर्थिक फसवणूक, शारीरिक/मानसिक छळ, बालसुरक्षा उल्लंघन, सततचा अवमान.

    • शिस्तभंग समिती core team (3 सदस्य) सुनावणी → लिखित आदेश → सर्व प्रवेश रद्द.

    • पश्च-प्रक्रिया: दस्तऐवज हस्तांतरण, संपत्ती/डिव्हाइस परतावा, कायदेशीर नोंदी जतन.

3) जिल्हा समन्वयक (Coordinator)
(पात्रता)
  • कार्यक्रम अंमलबजावणी, स्वयंसेवक व्यवस्थापन

  • 12+ महिने सतत उत्कृष्ट अंमलबजावणी, शून्य नियम उल्लंघन.

  • जिल्हा पातळीवरील सर्व उपक्रमांमध्ये यशस्वी सहभाग, मोठ्या कार्यक्रमांचे नेतृत्व

  • 6+ मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभाग (lead).

  • लोकल जिल्हा टीम कडून शिफारस, चांगले समुदाय अभिप्राय.

(पदकपात)
  • कार्यक्रम वारंवार रद्द/अव्यवस्था/अनुपस्थिती, बजेट वा संमती, रिपोर्टिंग-सपशेलता

    • सुधारणा योजना (30-60 दिवस) → यशस्वी न झाल्यास भूमिकेची मर्यादा

  • कार्यक्रमस्थळी गंभीर सुरक्षा उल्लंघन, छळ/अनुचित वर्तन, डेटा/मीडिया गैरवापर, निधी गैरवापर, हिंसक/द्वेषयुक्त कृती

    • शिस्तभंग समिती core team (3 सदस्य) सुनावणी → लिखित आदेश → लोकल पातळीवर पदकपात.

3) Core Team Member
(पात्रता)
  • 24+ महिने जिल्हा समन्वयक (Coordinator) पदावर सतत उत्कृष्ट अंमलबजावणी,

  • शून्य नियम उल्लंघन

  • जिल्हा पातळीवरील सर्व उपक्रमांमध्ये यशस्वी सहभाग

  • लोकल जिल्हा टीम कडून शिफारस, चांगले समुदाय अभिप्राय.

  • कमीत कमी १०+ नवीन जिल्हा ऍडमिन तयार केले असतील तर

(पदकपात)
  • जिल्हा समन्वयक पदाचे पदकपात नियम, सोबतच

  • सलग ३ महिने किंवा त्यापेक्षा जास्त न सांगता inactive राहणे,

  • वैयक्तिक कारणामुळे स्वतःहून पद सोडणे.